दिवंगत मनोहर कदम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पुरस्कार..

दिवंगत मनोहर कदम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पुरस्कार..

वैभववाडी /-

विकास विद्यालय सडूरे – अरुळे या हायस्कूलमध्ये सन 2019 – 20 या शैक्षणिक वर्षात मातृभाषा मराठी विषयात प्राविण्य मिळविलेल्या कु श्रध्दा शशिकांत रावराणे हिला सुनीता कदम यांच्या हस्ते रोख रक्कम रु.1,111/- , प्रशस्ती पत्र व सन्मान चिन्ह देऊन नुकतेच गौरविण्यात आले.
दिवंगत मनोहर भागोजी कदम हे सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक होते.त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या स्मृति कायम राहाव्यात म्हणून दरवर्षी माध्यमिक परिक्षेत इयत्ता दहावीमध्ये मराठी विषयात सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांला कदम कुटूंबाकडून पुरस्कार दिला जात आहे.
यावेळी हायस्कूलचे मुख्याध्यापक लाड,अरुळे सरपंच उज्ज्वल नारकर, उपसरपंच सुहास जांभळे,शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो:एस.एस.सी.परीक्षेत मराठी विषयात प्राविण्य मिळविलेल्या श्रध्दा रावराणे हिला पुरस्कार वितरण करताना मान्यवर.छाया:(मोहन पडवळ)

अभिप्राय द्या..