मसुरे /-

सन २०२०-२१ शैक्षणिक वर्षाकरिता जि प शाळांना द्यावयाचे वार्षिक सुट्टयांची यादी प्राथमिक शिक्षणाधिकारी सिंधुदुर्ग यांनी सर्व प्राथमिक शिक्षक संघटना सिंधुदुर्ग यांची दिनांक ६-५-२०२० रोजी बैठक घेऊन निश्चित केली होती. परंतु कोवीड १९ प्रादुर्भाव आपत्कालीन परिस्थितीचे कारण दाखवून सदरचे परिपत्रक निर्गमित होऊ शकले नव्हते. शासनाच्या निर्देशाप्रमाणे दि २७ जानेवारी २०२१ पासून इ ५ वी ते ८ वीचे वर्ग नियमितपणे सुरू करण्यात आले असून इ १ ली ते ४ थी चे वर्ग नजीकच्या काळात सुरू होण्याचे सूतोवाच करण्यात आलेले आहे . त्यामुळे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील उर्वरित शालेय दिवसांमध्ये शाळांना द्यावयाच्या किरकोळ सुट्टया या अधिकृतरित्या कळणे आवश्यक आहे. किरकोळ सुट्टयांचे परिपत्रक शाळांना जोपर्यंत दिले जात नाही तोपर्यंत याबाबत विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्यामध्ये संभ्रमावस्था आहे. त्यामुळे सदर परिपत्रक शाळांना तात्काळ निर्गमित करण्यात यावे अशी मागणी प्राथमिक शिक्षक समिती शाखा सिंधुदुर्ग च्या वतीने मुख्यकार्यकारी अधिकारी जि प सिंधुदुर्ग यांचेकडे जिल्हाध्यक्ष श्री नितीन कदम व जिल्हासरचिटणीस श्री सचिन मदने यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page