वेंगुर्ला /-
वेंगुर्ला तालुक्यातील दाभोली सडा येथील आंबा व काजू बागायतीस गुरुवारी दुपारी अचानक आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.यामध्ये दाभोली सरपंच उदय शिवराम गोवेकर व संतोष शिवराम गोवेकर यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान गुरुवारी दुपारी सुमारे १.३० वा. च्या सुमारास ही आग लागली असून मोठे नुकसान झाले आहे.यामध्ये उदय शिवराम गोवेकर व संतोष शिवराम गोवेकर यांची आंब्याची मोठी ७० कलमे व काजूची सुमारे १ हजार ५०० कलमे जळून नुकसान झाले आहे.गुरुवारी सायंकाळी ७ वा. सुमारास आग आटोक्यात आली.ही आग विझविण्यासाठी संजय पेडणेकर, संदिप बोवलेकर,उदय गोवेकर, रोहित गोवेकर,सुदेश कुंडेकर,वेंगुर्लेकर,दाभोलकर, हळदणकर, अन्य ग्रामस्थ,युवा कार्यकर्ते,निलेश चमणकर,समाधान बांदवलकर आदींसह अन्य ग्रामस्थांनी सहकार्य केले.तसेच वेंगुर्ले न.प.बंब व समिर आरोलकर यांनीही आग विझविण्यासाठी सहकार्य केले.या नुकसानीची तलाठी आर.बी.कदम व कृषी विभागाच्या वतीने पंचयादी करण्यात आली आहे.यावेळी तलाठी यांच्यासह कृषी सहाय्यक लाडू जाधव,ग्रामसेवक चेतन अंधारी,पोलिसपाटील जनार्दन पेडणेकर, कोतवाल सुभाष दाभोलकर,उपसरपंच पपन बांदवलकर,ग्रा.प.सदस्य,माजी पं. स.सदस्य समाधान बांदवलकर,सामाजिक कार्यकर्ते निलेश चमणकर,शिवसेना उपतालुकाप्रमुख उमेश नाईक आदींनी भेट देऊन पाहणी केली.