वैभववाडी /-

करुळ घाटातील धोकादायक वळणावर लादीने भरलेल्या ट्रकला अपघात झाला. या अपघातात एकजण जखमी झाला आहे. जखमींला येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात गुरुवारी सकाळी १०. वाजण्याच्या सुमारास घडला. दरीकडील साईडपट्टीवर ट्रक पलटी झाला आहे. सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे. घटनास्थळी वैभववाडी पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांच्यासह, सह्याद्री जीव रक्षक टीम आणि ग्रामरक्षक दल रवाना झाले आहेत.
चालक ऋतिक बबन दुर्गाडे आपल्या ताब्यातील ट्रक एमएच ११ एएल ७११५ कोल्हापूरहून सावंतवाडीकडे जात असता दिंडवणे नजिक चालकाने अचानक ब्रेक मारल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाला. सुदैवाने मोठा अनर्थ टळला. दरम्यान करुळ चेकपोष्टवर ड्युटीवर असणाऱ्या श्री. पडवळ, श्री. शिंदे या दोन पोलिस कर्मचाऱ्यांना अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. तसेच सह्याद्री जीव रक्षक टीम व ग्रामरक्षक दल अपघातस्थळी दाखल झाले आहेत.
या ट्रकमध्ये हमाल शुभम दत्तात्रय मोडक यांच्यासह आणखी दोन हमाल होते. या अपघातात एकजण जखमी झाला असून जखमींला येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अधिक तपास वैभववाडी पोलिस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page