राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज ३फेब्रुवारीला दोडामार्ग येथे कार्यकर्ता मेळावा..

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज ३फेब्रुवारीला दोडामार्ग येथे कार्यकर्ता मेळावा..

दोडामार्ग /-

कार्यकर्ता हा पक्षाचा आधारस्तंभ मानला जातो आणि हाच आधारस्तंभ पक्ष मजबूत बनवण्यासाठी बळकट ठेवणे खूप गरजेचे असते, हेच उद्दिष्ट समोर ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यांनी बुधवार दिनांक o३ फेब्रुवारी २o२१ रोजी सकाळी ११ वाजता विलास हॉल, तहसीलदार कार्यालय दोडामार्ग समोर,जेष्ठ नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष श्री.अमित सामंत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते श्री.सुरेशभाई दळवी तसेच इतर प्रमुख मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत, यासाठी तालुक्यातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष मा. श्री .प्रदीप चांदेलकर यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..