जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचीन माहिती..
सिंधुदुर्गनगरी /-
इको फ्रेंडली गणेश मूर्तींना चालना मिळावी वर्षभर चालणारी इको फ्रेंडली इण्डस्ट्री या जिल्ह्यात निर्माण व्हावी या दृष्टीने गणेश मूर्तिकार संघ, भगिरथ ग्रामविकास प्रतिष्ठान व सिंधूदुर्ग जिल्हा बँक यांच्या विद्यमाने १८ ते २० फेब्रुवारी या काळात कणकवली येथील भगवती मंगल कार्यालयात तीन दिवसीय मूर्ती प्रदर्शन व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी गणेश मूर्तिकार संघाचे अध्यक्ष बापू ऊर्फ नारायण सावंत भगीरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ प्रसाद देवधर विलास मळगावकर उदय राऊत, अजय परब, दत्तात्रय मठकर व दत्ताराम सावंत, बंडू ठाकुर आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील पर्यावरणाचे नुकसान होऊ नये या जिह्यात भक्तिभावाने साजरा होणाऱ्या गणेशोत्सवात वापरण्यात येणाऱ्या गणेशमूर्ती सहजरीत्या पाण्यात विरघळणाऱ्या असाव्यात या दृष्टीने जिल्ह्यात इको फ्रेण्डली गणेश मुर्त्यांची चळवळ निर्माण व्हावी, या उद्देशाने २०१९ मध्ये कुडाळ येथे प्रदर्शन व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. पहिल्याच वर्षी चांगला प्रतिसाद लाभला होता. २०२० मध्ये कोरोनामुळे हा कार्यक्रम होवू शकला नव्हता. २०२१ यावर्षी हे प्रदर्शन आयोजित करून जिल्ह्यातील मूर्तीकारांना प्रोत्साहन देण्याचा तसेच या जिल्ह्यांत गणेशभक्तांमध्ये पर्यावरणपूरक इको फ्रेंडली व सहजरित्या पाण्यात विरघरळणारी गणेशमूर्ती वापरण्याबाबत संपूर्ण जिल्ह्यात मानसिकता निर्माण व्हावी यादृष्टीने पण या प्रदर्शनामागील उद्देश ठेवण्यात आला आहे. असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे.