मालवण / –
सिंधुदुर्ग ओरोस येथील जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी पदावर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय , मुंबई येथे सेवा वर्ग पद्धतीने कार्यरत असणारे श्री रमण फकीर पाटील महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ ( तांत्रिक ) यांची दि .१ सप्टेंबर,२०२० पासून नियुक्ती करण्यात आली असून श्री पाटील यांनी पदभार स्वीकारला आहे
श्री रमण पाटील यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत महाराष्ट्र शिक्षण सेवा गट -अ तांत्रिक या संवर्गातील पदांसाठी राज्यातून चतुर्थ क्रमांकाने निवड झाली होती
तसेच श्री रमण पाटील यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत महाराष्ट्र शिक्षण सेवा गट -अ कनिष्ठ तांत्रिक या संवर्गातील पदांसाठी राज्यातून द्वितीय क्रमांकाने तर ब तांत्रिक संवर्गातील पदासाठी प्रथम क्रमांकानेनिवड झाली होती त्यानंतर दि .१५ सप्टेंबर,२०१६ पासून त्यांची औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नाशिक येथे प्राचार्य पदावर नियुक्ती झाली होती
संचालनालय मुंबई येथे कार्यरत असताना त्यांनी संस्था विकास व्यवस्थापन, नियोजन , शिकाऊ उमेदवारी योजना , राष्ट्रीय सेवा योजना या कार्यासनांचा कार्यभार सक्षमपणे सांभाळला आहे.
आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारल्यावर प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना ते म्हणाले की, जिल्ह्यातील कारकिर्दीत औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वैभववाडी चे भूसंपादन व इमारत बांधकाम करणे , मुंबई संचालनालय च्या अखत्यारीतील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व संस्थामद्धे १०० टक्के प्रवेश करणे, प्रवेश घेऊन बाहेर पडणाऱ्या प्रशिक्षनार्थ्याच्या रोजगार व स्वयंरोजगारासाठी प्रयत्न करणे आणि औद्योगिक आस्थापनांच्या मदतीने जिल्ह्यातील सर्व संस्थामद्धे आमूलाग्र विकास करण्यासाठी प्रयत्न करणार आहे
देशात स्किल इंडिया, मेक इंडिया चे वारे वाहत असताना अधिकारी आणि कर्मचारी यांच्या रिक्त पदामुळे ठरवलेली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
त्यासाठी जिल्ह्यातील सन्माननीय लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी तसेच जिल्हावासीय यांच्या सक्रिय सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे