मालवण तालुक्यात १२ शहरात ४ तर ग्रामीण भागातील ८ रुग्णांचा समावेश..

मालवण तालुक्यात १२ शहरात ४ तर ग्रामीण भागातील ८ रुग्णांचा समावेश..

मालवण /-

येथील ग्रामीण रुग्णालयात आज केलेल्या तपासणीत कोरोनाचे १२ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. ही माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील यांनी दिली.
आज केलेल्या तपासणीत शहरातील मशिदगल्ली येथील २, रेवतळे येथील १, मेढा येथील १, तालुक्यातील तिरवडे येथील ६, ओवळीये येथील २ रुग्णांचा समावेश आहे. यात शहरातील एक पोलिस कर्मचाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

अभिप्राय द्या..