आचरा /-
सम्यक समाज प्रबोसम्यक समाज प्रबोधिनी, शिवडाव बौद्धवाडी* च्या वतीने भारताच्या संविधान दिनाचे व 72 व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शिवडाव ग्रामपंचायतीला इलेक्ट्रिक वॉटर कूलर भेट देण्यात आला. या वेळी शिवडाव गावचे सरपंच सौ.वनिता जाधव, प्रबोसम्यक समाज प्रबोधिनीचे अध्यक्ष दिनेश तांबे,उपसरपंच श्री.लवू वाळके,ग्रामपंचायत सदस्य श्री नितीन हरमलकर, ग्रामसेवक श्री केदार भाऊ तसेच ग्रामस्थ श्री. नितीन गांवकर, श्री.मिलिंद गांवकर, श्री.दिपक कोरगावकर, सम्यक समाज प्रबोधिनी शिवडाव बौध्दवाडीचे कार्याध्यक्ष नित्यानंद तांबे, उपाध्यक्ष रंजन पवार आणि सुनिल तांबे, अविनाश य. तांबे आणि सचिन तांबे.नितीन सहदेव पवार, तेजस सुनिल तांबे तसेच इतर मान्यवर आदी सदस्य उपस्थित होते.
मंडळाच्या या सहकार्याबद्दल सरपंच वनिता जाधव यांनी धन्यवाद वक्त केले आहेत.