वेंगुर्ला /-
वेंगुर्ला तालुक्यातील ३० ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत आज गुरुवार २८ जानेवारी रोजी तहसिलदार कार्यालयात काढण्यात आली.यावेळी वेंगुर्ले तहसिलदार प्रविण लोकरे, नायब तहसिलदार संतोष बांदेकर, नागेश शिंदे यांच्या उपस्थितीत सरपंच पदांचे आरक्षण जाहीर झाले.यामध्ये आसोली अनुसूचित सर्वसाधारण तर म्हापण अनुसूचीत महिलासाठी आरक्षित, ना. मा. प्र. महिला साठी मोचेमाड, परबवाडा, मातोंड, होडावडा तर ना. मा. प्र. सर्वसाधारण साठी उभादांडा, कोचरा, केळुस, दाभोली आरक्षित, सर्वसाधारण महिलामध्ये तुळस, आडेली, पाल, परुळे,वेतोरे, चिपी, वजराट, मठ, शिरोडा, भोगवे इत्यादी ग्रामपंचायती,तसेच सर्वसाधारणमध्ये सागरतीर्थ,आरवली,मेढा, कुशेवाडा, अणसुर, पालकरवाडी, पेंडूर, रेडी, खानोली, वायंगणी इत्यादी ग्रामपंचायतींचा समावेश आहे.