सावंतवाडी /-

येथील कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या प्रा.रमेश चिटणीस ग्रंथालयास आज प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनसाठी 81पुस्तके देणगी देण्यात आली.
देणगीदार प्रफुल्ल सांगोडकर यांनी अभिनव ग्रंथालय व अभिनव फाऊंडेशन च्यावतीने ही देणगी दिली. अभिनवचे खजिनदार जितेंद्र मोरजकर, तुषार विचारे यांनी सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार मुकूंद वझे,मुख्याध्यापक एन.पी.मानकर यांच्याकडे ही पुस्तके सुपूँत केली. यावेळी ओंकार तुळसुलकर, कमँचारी हषाँ जाधव, सदानंद जाधव उपस्थित होते.
सेवानिवृत्त बँक अधिकारी श्री.सांगोडकर हे शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. तसेच ते अभिनव ग्रंथालयाचे आजीव सभासद आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांना उपयुक्त 81 पुस्तके दिली आहेत. त्यामध्ये कवीवयँ मंगेश पाडगावकर, वि.दा.करंदीकर, व्हिजन आँफ इंडिया अशी विविध इंग्रजी व मराठी माध्यमाची पुस्तके आहेत. प्रा.चिटणीस ग्रंथालयातफेँ प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन विद्याथ्याँसाठी उपयुक्त ग्रंथालय साकारले आहे. ग्रंथालयामाफँत उत्तम विद्यार्थी वाचक घडावेत, असा प्रयत्न आहे.ग्रंथालया माफँत विविध उपक्रम राबविले जातात. यासंदर्भात माजी विद्याथीँ, देणगीदार, पालक,हितचिंतक मुलांच्या वाढदिवसा दिवशी, प्रियजनांच्या स्मृती प्रित्यर्थ ग्रंथालयास पुस्तके भेट देऊ शकतात. शाळेचे माजी विद्यार्थी यांच्याकरीता एक पुस्तक एक विद्यार्थी ही योजना माजी विद्यार्थी मेळाव्या दरम्यान राबविण्यात आली. ग्रंथालयामाफँत आजही मोठ्या प्रमाणात पुस्तकांचे संकलन व ग्रंथ देवघेव सुरु आहे. जास्तीत जास्त देणगीदार, माजी विद्यार्थी, पालक यांनी शाळेच्या ग्रंथालयास सहकार्य करावे, असे आवाहन संस्थाध्यक्ष शैलेश पै, सचिव प्रसाद नावेँकर, संचालक राजश्री टिपणीस यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

You cannot copy content of this page