वैभववाडी /-
वैभववाडी तालुक्यात शुक्रवारी आणखी नवीन तीन कोरोना पाॕझिटीव्ह रुग्ण सापडले आहेत.यामध्ये एका शिक्षकाचा समावेश आहे.तर गुरुवारी राञी उशीरा एक रुग्ण सापडला आहे.त्यामुळे आतापर्यंत तालुक्यात ८६ कोरोना पाॕझिटीव्ह रुग्ण सापडले आहेत.तर सध्या २४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
तालुक्यात कोरोना रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ सुरुच आहे.गुरुवारी एक नवजात बालक कोरोना पाॕझिटीव्ह आले आहे.तर शुक्रवारी यामध्ये आणखी भर पडली आहे.वैभववाडी शहरातील दोन व्यक्ती कोरोना पाॕझिटीव्ह झाल्या आहेत.तर एडगाव येथील एक व्यक्ती अशा एकूण तिघांचे रिपोर्ट पाॕझिटीव्ह आले आहेत.हे सर्व स्थानिक रहीवाशी आहेत.स्थानिकांमध्ये वाढता पादुर्भाव ही चिंतेची बाब बनत आहे.
वैभववाडी शहरातील कंटेंमेंट झोन बुधवारपासून उठविण्यात आले आहे.तरीही नागरीकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये.बाहेर पडल्यास मास्क व सोशल डिस्टंट, सॕनिटायझरचा वापर करावा.असे आवाहन तालुका वैदयकीय अधिकारी डाॕ.उमेश पाटील यांनी केले आहे.