कुडाळ /-
नोकरीसाठीच्या इंटरव्ह्यूसाठी प्रवासा दरम्यान वाशी मुंबई येथून परत कुडाळ बाँबर्डे येथे येत असताना कु.दिप्ती यशवंत चव्हाण वय 25 तालुका कुडाळ ,ही युवती तेर्सेबांबर्डे मळावाडी. या युवती ट्रकने मागुन ठोकर दिल्याने झालेल्या अपघातात जागिच ठार झाली. ठोकर दिल्यानंतर या युवतीचा तोल गेला व ती खाली पडल्यानंतर मागून येणाऱ्या याच ट्रकची तिला ठोकर बसल्याने तिचा यात जागिच मृत्यू झाला. कु. दिप्ती हिला ठोकर बसली. यानंतर तिला त्वरीत तेथीलच रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता येथील वैद्यकीय अधिकारी यांनी तीचे उपचारापुर्वीच निधन झाल्याचे सांगितले. दरम्यान बुधवारी सायंकाळी तिचा मृतदेह तेर्सेबांबर्डेतील घरी आणून तिच्यावर शोकाकूल वातावरणात दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.