कुडाळ /-
लहान मुलांच्या अंगावर मोटरसायकल का नेली याची विचारणा केल्याचा रागातून पावशी भोगटेवाडी येथील शुभम शंकर भोगटे २२ रा पावशी भोगटेवाडी याला माराहाण करण्यात आली. या प्रकरणी पावशी येथील तिघांवर कुडाळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी सकाळी १०.३० वा घडली.
यातील शुभम भोगटे याची स्पृहा, भाउ परशुराम, तनिश हे तिघे पाटाच्या पाण्यात खेळत होते. यावेळी यावेळी याचवाडीतील ओमकार भोसले हा मोटरसायकल मुलांच्या अंगावर घेऊन आला. याबाबत ओमकार याला विचारणा केल्यावर यावेळी दोघांमध्ये बाचाबाची झाली. यानंतर शुभम हा पोलिसात तक्रार देण्यासाठी येत होता. यावेळी ओंकार भोसले हा पावशी येथील शांतादुर्गा हाँल येथे पाठीमागून मोटरसायकल घेऊन आला. यावेळी शंकर मयेकर व गणेश भोसले असे तिघेजण ट्रिपलसिट होते.यावेळी त्यांनी शिवीगाळ व धमकी देत शुभमच्या मीटर सायकलला पाठीमागून ठोकर दिली.शंकर मयेकर हा बांबू घेऊन ते मारण्यासाठी पाठीमागून फिरवला.यानंतर शुभम याने याकडे दुर्लक्ष करत पुढे आल्यावर परत पाठिमागून येत भंगसाळ पुलावर मोटरसायकलला ठोकर दिली. यावेळी शंकर मयेकर याने बांबु मारला यावेळी शुभम हा तोल जाऊन खाली पडला व यात शुभम याला दुखापत झाली. याप्रकरणी शुभम याने कुडाळ पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून ओमकार भोसले, गणेश भोसले, शंकर मयेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.