वेंगुर्ला /-

आज खासदार विनायक राऊत,आमदार दिपक केसरकर, आमदार वैभव नाईक यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी यांच्यासह आज चिपी विमानतळ येथे पाहणी करण्यात आली आहे.विमान उड्डाण व लँडिंगसाठी यंत्रणा सज्ज असून येत्या ८ ते १० दिवसांमध्ये चिपी- सिंधुदुर्ग विमानतळ सुरू होणार आहे,अशी माहिती आज
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी चिपी विमानतळ येथे पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी खासदार विनायक राऊत,माजी पालकमंत्री व आमदार दिपक केसरकर, आमदार वैभव नाईक,जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी,मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर,जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे,शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते,नेते संदेश पारकर,आर.बी.आय.अधिकारी किरणकुमार,राजेश लोणकर,डांगरे,शैलेश परब,सचिन देसाई,पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना उदय सामंत म्हणाले की,येत्या ८ ते १० दिवसात विमानाचे पहिले उड्डाण विमान मुंबईवरून सिंधुदुर्ग विमानतळावर व सिंधुदुर्गवरून -मुंबई येथे जाईल. तांत्रिक बाबी पूर्ण करणे ही त्या त्या प्रशासनाची जबाबदारी आहे.विमानतळ शुभारंभ बाबत तांत्रिक बाबी पूर्ण करण्याच्याया दृष्टीने आज बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला आहे.रस्त्याचे काम,सुशोभीकरण कामे,विमान येताना घ्यावयाची सुरक्षितता सेंट्रल गव्हर्नमेंट सिक्युरिटी बाबत,पोलिस ऑफिसर,पोलिस कॉन्स्टेबल, सुरक्षा रक्षक विविध आवश्यक बाबी याबाबत आज चर्चा झाली आहे.या सर्व बाबतीत जे जे काही विमान उड्डाणासाठी व लँडिंगसाठी यंत्रणा सज्ज आहेत.फक्त दिल्लीवरून परमिशनस मिळायच्या आहेत,त्या मिळाल्यानंतर ८- १० दिवस एअरलाईन्सला बाकीच्या पूर्तता करावी लागणार आहेत.तारीख निश्चित झाली नसली तरी येत्या ८ ते १० दिवसात सिंधुदुर्ग विमानतळ सुरू होणार आहे,अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
पॅसेंजरच्या सुरक्षितततेच्या दृष्टीने विमानसेवा सुरक्षित सुरू करणे,हे प्राधान्य आहे.
सांघिक प्रयत्नातून व केंद्र शासनाने संपूर्ण सहकार्य मिळत असल्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख करताना विमानतळ उड्डाणासाठी सज्ज असल्याचे म्हटले.
यावेळी खासदार विनायक राऊत माहिती देताना म्हणाले की,एअरलाईन्स तांत्रिक मेंटेनन्स विभागामार्फत काल व आज आवश्यक तपासण्या सुरू आहेत.उद्या त्यांच्या सूचनांनुसार आय.आर. बी.उद्यापर्यंत डिजिसीए कडे एटीआर सादर करतील.त्यानंतर पुन्हा टीम येऊन पाहणी करतील.त्यांनतर डिजीसीएचे लायसन्स मिळाल्यानंतर अलायन्स एअर कंपनी अधिकारी येऊन विमानतळ पाहणी करतील.या सर्व प्रक्रियेला आठ ते दहा दिवस जाण्याची शक्यता आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व केंद्रीयमंत्री हरदीपसिंग पुरी यांचे सहकार्य मिळत आहे.राज्य सरकारने पायाभूत सुविधा पुरविलेल्या आहेत.आमदार वैभव नाईक व दिपक केसरकर यांचेही चांगले काम सुरू आहे.
यावेळी आमदार दिपक केसरकर बोलताना म्हणाले की,महाराष्ट्रातील एअरपोर्ट पैकी चिपी येथील हे सुंदर एअरपोर्ट आहे.खासदार राऊत यांच्या प्रयत्नातून आणखी विमानउड्डाणे सुरू होण्याचे प्रयत्न सुरू आहेत.गोव्याला पर्यायी म्हणून हा विमानतळ होईल.पर्यटनाच्या दृष्टीने हे महत्वाचे पाऊल असून पर्यटनाची चांगली मुहूर्तमेढ असल्याचे आमदार केसरकर म्हणाले.पालकमंत्री ,खासदार,आमदार यांनी पदाधिकारी यांच्यासमवेत पाहणी वेळी प्रत्येक डिपार्टमेंटला भेट देऊन माहिती घेतली व सूचना केल्या.यावेळी
शिवसेना वेंगुर्ला तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब,उपजिल्हाप्रमुख आबा कोंडसकर,सुनिल डुबळे,बाळा दळवी,चिपी सरपंच गणेश तारी, परुळेबाजार उपसरपंच विजय घोलेकर तसेच वेंगुर्ले तहसीलदार प्रविण लोकरे,गटविकास अधिकारी उमा पाटील,तसेच अन्य खात्याचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page