नेरूरचे सुपुत्र यशवंत नाईक यांना MDRT USA 2021जागतिक पुरस्काराने सन्मानित..

नेरूरचे सुपुत्र यशवंत नाईक यांना MDRT USA 2021जागतिक पुरस्काराने सन्मानित..

कुडाळ /-

नेरूरचे सुपुत्र यशवंत नाईक यांना MDRT USA 2021जागतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. श्री. यशवंत नाईक यांनी विमा क्षेत्रातील बहुप्रतिष्ठित समजला जाणारा मानाचा किताब MDRT USA अवघ्या कमी कारकीर्दीत मिळवून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक आगळा वेगळा आदर्श निर्माण केला आहे यशवंत नाईक यांच्या कामगिरीचा चढता आलेख असून एजन्सीच्या पहिल्या दोन्ही वर्षात 200 पेक्षा जास्त पॉलिसी करून दोनवेळा द्विशतकवीर चा सन्मान मिळवलेला आहे त्यांची ही कामगिरी खरोखरच अद्भुत आणि कौतुकास्पद आहे.

श्री यशवंत नाईक यांच्या कामगिरीबद्दल प्रशंसा केली. नाईक यांच्या मनमिळाऊ स्वभाव, शांत संयमी वृत्तीचा स्वभाव आहे. श्री यशवंत नाईक हे विमा विक्री पश्चात ग्राहकांना गरजेची असलेली सर्व सेवा देतात हे त्याच्या यशाचे गमक आहे.

याप्रसंगी सत्कार मूर्ती श्री यशवंत नाईक म्हणाले मला मिळालेल्या MDRT पुरस्काराचे सर्व श्रेय माझे गुरुवर्य व मार्गदर्शक टिम लिडर श्री सुरेशजी शेटये सर आणि माझे सर्व विमाधारक यांना जाते.जीवनात आतापर्यंत मोलाचे मार्गदर्शन लाभले असे सर्व गुरुजन या सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद त्यांनी दिले.विशेष म्हणजे माझे गुरू श्री सुरेश शेटये सर सलग दहा वर्षे MDRT USA हा जागतिक सन्मान मिळवणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव प्रोफेशनल विमा सल्लागार आहेत.अशा यशस्वी,अनुभवी गुरूंकडून मार्गदर्शन लाभल्याने या पुरस्काराचा मानकरी होऊ शकलो.श्री सुरेश शेटये यांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.

श्री सुरेश शेटये यांची प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले श्री यशवंत नाईक यांनी हे अभूतपूर्व यश मिळवले आहे. नावाप्रमाणेच यशवंत तर तो आहेच हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले. यशवंत मधील चांगल्या मनमिळाऊ स्वभावामुळे, ध्येय,चिकाटी व मेहनत हे सर्वगुण आत्मसात करण्याबरोबरच नवनवीन आवश्यक गोष्ट शिकण्याकडेही त्यांचा प्रयत्न सुरू आहेत यामुळेच ते आज अल्पावधीतच अशा जागतिक पुरस्काराचे मानकरी ठरले असे भरभरून कौतुक त्यांनी केले. संपूर्ण जगभरातून बहुसंख्य देशातील विमा कंपन्याचे विमाप्रतिनिधी जे जागतिक निकषाप्रमाणे काम करतात त्यांनाच हा जागतिक MDRT सन्मान बहाल केला जातो.अशा सर्व MDRT पुरस्काराने सन्मानित प्रोफेशनल विमाप्रतिनिधीचे संमेलन अमेरिका मध्ये दरवर्षी घेण्यात येते या कार्यक्रमास श्री यशवंत नाईक आपली उपस्थिती दर्शवतील असा विश्वास शेटये यांनी व्यक्त केला.

अभिप्राय द्या..