वेंगुर्ला /-
वेंगुर्ला तालुक्यातील सागरतीर्थ व आरवली ग्रामपंचायत साठी आज एकूण ७४.५९ % मतदान झाले.दोन्ही ग्रा.प.च्या सहा मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.दोन्ही मतदान केंद्रावर सकाळी ७.३० वा.पासून मतदानास सुरुवात झाली.सुरुवातीला मतदारांचा जोर कमी होता.दुपारनंतर तो वाढला.दुपारपर्यंत सागरतीर्थ येथे ४७.४५ ℅ व आरवलीत ४३.७५ ℅ मतदान झाले होते.
सागरतीर्थ ग्रामपंचायत
एकूण मतदार संख्या १ हजार ६६५ पैकी एकूण १ हजार २२६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.सागरतीर्थ येथे ७३.६३ मतदान झाले.
आरवली ग्रामपंचायत एकूण मतदार संख्या १ हजार ७१२ पैकी १ हजार २९३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.आरवली येथे
येथे ७५.५२ टक्के मतदान झाले.दोन्ही ग्रा.प.साठी ३ हजार ३७७ पैकी २ हजार ५१९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.दोन्ही ग्रा.प.साठी एकूण ७४.५९ % मतदान झाले आहे.