सिंधुदुर्ग /-

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला मोठे यश मिळाले आहे. हवामान आधारित फळ पीक विमा योजनेअंतर्गत चालू वर्षी विमा कंपनी कडून तब्बल २२ कोटी ९४ लाख येवढी नुकसान भरपाईची रक्कम प्राप्त जिल्हा बँकेला झाली आहे. सिधुदुर्ग जिल्हा बँकेच्या ४ हजार ३०६ आंबा पीक विमा उतरलेल्या सभासद शेतकर्‍यांना लाभ मिळाला आहे.अशी माहीती जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिली. प्रधानमंत्री फसल विमा योजना २०१९ अंतर्गत जिल्ह्यातील आंबा व काजू बागायतर ५३३४ शेतकर्‍यांनी जिल्हा बॅंकमार्फत २ कोटी ७२ लाखांचा विमा उतरविला होता. भारतीय कृषि विमा कंपनी मुंबई ( AIC) मार्फत हा विमा ऊतरविण्यात आला होता. पैकी आंबा शेतकर्‍यांसाठी २२ कोटी ९४ लाख इतकी विमा रक्कम जिल्हा बँकेकडे जमा झाल्याने कोरोना आपत्तीत आंबा बागायतदार शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्हा बँकने अध्यक्ष सतीश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने संबधित विमा कंपनी व शासन स्तरावर केलेल्या पाठपुरव्याला मोठे यश मिळाले आहे. यावर्षी सुद्धा आंबा व काजू बागायतदार यांनी ३० नोव्हेंबर पर्यंत शेतकर्‍यांनी आपली विमा रक्कम भरून विमा कवच घेण्याचे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page