मालवण तालुक्यात करोनाचा सहावा बळी..

मालवण तालुक्यात करोनाचा सहावा बळी..

मालवण /-

मालवण तालुक्यात करोनाचा सहावा बळी गेला आहे. जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू झाला आहे. याबाबत वैद्यकीय अधिकारी यांनी माहिती दिली आहे.आचरा परिसरातील ही महिला होती. यापूर्वी ही आचरा परिसरातील एका व्यक्तीचा मृत्यू करोनामुळे झाला होता. आचरा परिसरात हा दुसरा बळी गेला असून तालुक्यातील सहावा बळी ठरला आहे. यामुळे ओरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे.मालवण तालुक्यात आजपर्यंत 188 रुग्ण करोना पाॅझिटिव्ह सापडले आहेत. यापैकी 110 रुग्ण बरे झालेले आहेत. इतरांवर उपचार सुरू आहेत.

अभिप्राय द्या..