वेंगुर्ला /-
वेंगुर्ला तालुक्यातील आरवली व सागरतीर्थ या दोन ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुका होत आहेत.दरम्यान आज आरवली गावचे ग्रामदैवत श्री देव वेतोबा चरणी वेंगुर्ले राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक विधाता सावंत यांच्या हस्ते श्रीफळ ठेऊन निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष इर्शाद शेख,नगरसेवक प्रकाश डिचोलकर,पं .स.उपसभापती सिद्धेश उर्फ भाई परब,माजी सभापती जगन्नाथ डोंगरे,विभागीय अध्यक्ष मयूर आरोलकर,माजी पं. स.सदस्य बबन बागकर,धर्माजी बागकर,तसेच आरवली – सागरतीर्थ चे उमेदवार उत्तम चव्हाण,शितल मेस्त्री, अंकिता चव्हाण,सोनाली चव्हाण,प्रविण मेस्त्री,चंद्रकांत साळगावकर,राजेश गोडकर,पांडुरंग फोडनाईक,प्रणय बागकर,सुषमा गोडकर, प्रज्ञा बागकर,ग्लोरिया फर्नांडीस ,महेश चव्हाण,विभागीय अध्यक्ष किरण तांडेल आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.