वैभववाडी /-
वैभववाडी येथील शासकीय गोडाऊनच्या बाजूला टपरीजवळ मटका जुगार अड्ड्यावर वैभववाडी पोलिसांनी अचानक धाड टाकून 1640 व रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करून आरोपीवर वैभववाडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी निलेश शांताराम म्हापुसकर वय 30 असे नाव आहे.ही कारवाई 7 जानेवारी रोजी दुपारी 12:35 वाजता करण्यात आली.वैभववाडी शहरातील शासकीय गोडाऊन च्या बाजूला आरोपी मटका व जुगार खेळत असल्याचे माहिती वैभववाडी पोलिसांना मिळाली.
त्यानंतर वैभववाडी पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधिकारी रविकांत अडुळकर, पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा सोनटक्के यांनी धाड टाकून 1640 रोख रक्कम मटका जुगार खेळण्याचे साहित्य जप्त केले. त्यानंतर आरोपीवर वैभववाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून त्याला नोटीस देण्यात आली आहे .या घटनेची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा सोनटक्के यांनी वैभववाडी पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे.