कणकवली /-
मोदी सरकारच्या कृषी विधेयकाच्या समर्थनासाठी मुंडे डोंगरी येथून भव्य ट्रॅक्टर रॅलीला सुरवात झाली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार नारायण राणे, भाजपा किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष डॉ अनिल बोनडे यांच्या नेतृत्वाखाली कणकवली विधानसभा मतदारसंघातील हजारो शेतकरी ट्रॅक्टर रॅलीमध्ये सहभागी झाले आहेत. भाजपा आमदार रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांच्यासह भाजपाचे प्रमुख पदाधिकारी रॅलीत सहभागी झाले आहेत. कणकवली प्रांताधिकारी कार्यालयावर रॅली धडकणार असून कृषी विधेयकाच्या समर्थनाचे निवेदन प्रांताधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे. त्यानंतर भाजपा कार्यालयानजीक रॅलीचे सभेत रुपांतर होणार असून कृषी विधेयकाबाबत भाजपा चे नेते मार्गदर्शन करणार आहेत.