वेंगुर्लेत पत्रकार दिन साजरा..

वेंगुर्लेत पत्रकार दिन साजरा..

वेंगुर्ला /-

लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेतून चांगले विधायक कार्य होत आहे.दर्पणकार बाळशास्त्री जांभेकराना अपेक्षित वारसा वेंगुर्ले तालुक्यातील पत्रकार जपत आहेत.लोकशाहीच्या दोन्ही बाजूंचा विचार करून पत्रकार समाजास दिशा देण्याचे काम करीत आहेत,असे प्रतिपादन वेंगुर्ला पंचायत समिती सभापती अनुश्री कांबळी यांनी वेंगुर्ला येथे केले.

वेंगुर्ले तालुका पत्रकार समिती तर्फे आज तरुण भारत कार्यालया नजिकच्या पत्रकार कार्यालयात पत्रकार दिन साजरा करण्यात आला.प्रमुख पाहुणे जिल्हा बँक संचालिका,व महिला औद्योगिक सहकारी काथा कारखान्याच्या संचालिका प्रज्ञा परब यांच्या हस्ते बालशात्री जांभेकर त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी व्यासपीठावर सभापती अनुश्री कांबळी,वेंगुर्ले पत्रकार समिती अध्यक्ष के.जी. गावडे,
उपाध्यक्ष प्रदीप सावंत,सीमा मराठे हे होते.यावेळी जिल्हा पत्रकार संघाचा,उत्कृष्ट पुरस्कार प्राप्त पत्रकार
दीपेश परब चा पत्रकार समिती तर्फे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी पत्रकार भरत सातोस्कर,सचिव दाजी नाईक,मॅक्सि कार्डोज,
आपा परब,एस.एस. एस.धुरी,विनायक वारंग,
अजय गडेकर, प्रथमेश गुरव,योगेश तांडेल,सूरज परब आदी उपस्थित होते.प्रास्तविक सीमा मराठे,स्वागत के.जी. गावडे, आभार प्रदीप सावंत यांनी मानले.

अभिप्राय द्या..