मालवण /-
डाँ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे (बार्टी) यांच्या समतादूत प्रकल्पाच्यावतीने बांगीवाडा समाजमंदिर येथे सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. प्रारंभी डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या चारुशिला देऊलकर, कौटुंबिक सल्ला केंद्राचे समुपदेशक मनोज गिरकर, फुले, शाहू, आंबेडकर विचारमंचचे अध्यक्ष किशोर चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते पी.के.चौकेकर, उमेश मांजरेकर, वैभव वळंजू, राहुल जाधव सिद्धेश आचरेकर, अमित खोत, एस.एस.कासले आदि उपस्थित होते.