कोल्हापूर /-
येथील लोकनियूक्त सरपंच गावात कोट्यावधी रूपयाची नळपाणीपूरवठा मंजूर केली असल्याचे गावातून ङांगोरा पिटत आहेत.त्यांनी मंजूर केलेल्या या योजनेच्या मंजूरीची कागदपत्रे सर्व मतदारांच्या समोर’ एका व्यासपीठावर येवून दाखविल्यास निवङणूकीतून माघार घेतो. असे आव्हान सरपंच विरोधी सर्वपक्षीय आघाङीचे नेते बी. एस. पाटील यांनी केले.
आज रात्री उशिरा त्यांनी मातंग वसाहतीमध्ये प्रचार केला त्यानंतर आयोजीत केलेल्या बॅठकित ते बोलत होते.
पाटील म्हणाले””नवीन पाणीपूरवठा योजनेच्या बाबतीत सरपंच आणी त्यांचे कूटूंबिय”व त्यांचे हितचिंतक 1 कोटी17 लाखाची नवीन योजना मंजूर करून आणली आहे.असे गावातील लोकानां भूलथापा मारत सूटले आहेत.त्यांनी या योजनेच्या कामाचे मंजूरपत्र दाखवावे आम्ही सर्व सदस्य निवङणूकीतून जाहीर माघार घेतो.कारण ही योजना अद्यापही मंजूर नसतानां गावातील जनतेची दिशाभूल करण्याचे काम सबंधित व्यक्तीकङून केले जात आहे. तसेच या योजनेच्या कामाकरिता आम्ही सदस्य भांङत आहोत असा ही आरोप सरपंच व त्यांची कंपनी करीत आहे.या कामाबाबतचे ठराव दोन वर्षामागे दिले गेले असल्याचे दिसून येते. त्यावेळी देखील सदस्यानां विचारात घेतले नाही आणी तो ठराव रितसर जिल्हापरिषद ग्रामीण पाणीपूरवठा विभागाकङे न देता निगवे खालसा ( ता. करवीर) येथील एका ठेकेदाराकङे दिलेला आहे.याचाच अर्थ असा आहे की’तो ठराव सबंधीत कार्यालयाकङे न देता ठेकेदाराकङे देण्यामागचे गाॅङबंगाल काय? सदर व्यक्तीने गावातील ग्रामपंचायत सदस्य नसलेल्या 4 ते 5 लोकानां सोबत नेवून हे ग्रामपंचायत सदस्य आहेत असे सांगून त्या ठेकेदाराची दिशाभूल करून त्यांच्याकङून मोठी रक्कम कमीशनपोठी हङप केली आहे अशी गावात दबक्या आवाजात चर्चा सूरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य सचीन पाटील”””आप्पासो पाटील””नेताजी साठे””शोभराज सूतार दिलीप साठे””साहील हेगङे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.