दोडामार्ग
श्री सातेरी जि.प.केंद्रशाळा साटेली भेडशी या शाळेत उपशिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या श्री दिग्विजय नागोजी फडके यांनी सादर केलेल्या नवोपक्रमाची राज्यस्तर स्पर्धेसाठी सलग तिसऱ्यादा निवड झाली आहे.
सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डाएट) सिंधुदुर्ग या संस्थेमार्फत राबविण्यात आलेल्या राज्य स्तर नवोपक्रम स्पर्धेत Enrichment of English in rural areas students through English Apps.हा नवोपक्रम शाळेत राबविला व हा नवोपक्रम स्पर्धेसाठी सादर केला.जिल्हा परिषद शाळेत येणारी मुले ही ग्रामीण भागातून व खेड्यापाड्यातून आलेली असतात.त्यांच्या घरी कोणतेही इंग्रजीचे वातावरण नसते शिवाय मुलाना आजकाल मोबाईलवरील वेगवेगळया apps ची माहिती आहे आणि मुलांना मुळातच भाषिक खेळ खेळायला आवडते. हा धागा पकडून मुलांना इंग्रजीचे apps देऊन त्याद्वारे वेगवेगळे इंग्रजी भाषिक खेळ खेळून इंग्रजी विषयीची भीती दूर करणे,इंग्रजीतील मूलभूत भाषिक कौशल्याचा विकास करणे, एकंदरीत इंग्रजीचे वाढते महत्व लक्षात घेऊन इंग्रजीची आवड निर्माण करून इंग्रजीचे समृद्धिकरण करणे हे उद्दात हेतू समोर ठेऊन राबविलेल्या या नवोपक्रमाला जिल्हा स्तरावर तृतीय क्रमांक मिळवत सलग तीन वर्षे जिल्हा व राज्य स्तरावर यश मिळवत यशाची परंपरा कायम ठेवली आहे.
दिग्विजय फडके हे एक उपक्रमशील शिक्षक म्हणुन परिचित आहेत जिल्हा व राज्य स्तरीय विविध स्पर्धेत त्यांनी उज्ज्वल यश मिळवले आहे त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.यासाठी त्यांना गट शिक्षण अधिकारी शोभराज शेर्लेकर शिक्षण विस्तार अधिकारी छाया बाळेकुंद्री मॅडम, साटेली भेडशी केंद्र प्रमुख सूर्यकांत नाईक मुख्याध्यापिका पूनम पालव व शाळेतील सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page