दोडामार्ग /-
दोडामार्ग तालुक्यातील काही ग्रामपंचायतींच्या निवडणूका असून आता या निवडणुका अगदी जवळ आल्या आहेत ,तर यासाठी ऑनलाइन पध्दतीने फॉर्म भरणे पद्धती सुरूच होती परंतु आता मात्र निवडणूक आयोगाने नवीन निर्णय घेतला असून आता ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरता येणार आहे तसेच त्याची मुदत देखील वाढवलेली आहे म्हणजेच ३o डिसेंबर २o२o पर्यंत संध्याकाळी ५ .पर्यंत फॉर्म भरता येणार आहे अशी माहिती निवडणूक आयोगाने दिलेली असल्याची माहिती दोडामार्ग निवासी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिली आहे.