पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर याना नागपूर येथे पुरस्कार प्रदान!

पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर याना नागपूर येथे पुरस्कार प्रदान!

मसुरे /-

नागपूर येथील मदत सामाजिक संस्थेच्या वतीने दिला जाणारा डॉ बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ठ पत्रकार पुरस्कार मसुरे गावचे सुपुत्र दै. तरुण भारतचे पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर यांना नुकताच समारंभ पूर्वक प्रदान करण्यात आला. सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल संस्थेच्या १८ व्या राज्यस्तरीय सामाजिक कार्यकर्ता संमेलनाचे औचित्य साधून सदर राज्य स्तरीय पुरस्कार पत्रकार पेडणेकर याना प्रदान करण्यात आला.
यावेळी राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत, राधिकाबाई पांडव चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त गिरिषभाऊ पांडव, आमदार अभिजित वंजारी, नागपूर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते तानाजी वनगे, माजी आमदार दीनानाथ पडोळे, आदी मान्यवर उपस्थित होते.
समता, बंधुता व राष्ट्रीय अखंडता टिकवून ठेवण्यासाठी सदैव कार्यरत रहा. आपल्या कार्याचा व अनुभवाचा लाभ यापुढेही समाज प्रबोधनासाठी व्हावा असे आवाहन यावेळी अध्यक्ष प्रा. प्रकाश सोनक यांनी बोलताना केले. यावेळी सचिव दिनेश वाघमारे , संस्था पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

अभिप्राय द्या..