वेंगुर्ला तालुक्यातील आडारी उभादांडा,येथील श्री देवब्राम्हण देवस्थानचा वार्षिक जत्रौत्सव गुरुवार दि.31/12/2020रोजी आडारी तलावाच्या निसर्गरम्य काठावर वसलेल्या श्रीदेव ब्राह्मण देवस्थानचा वार्षिक होत आहे.या जत्रौत्सव निमित्ताने सकाळी धार्मिक विधी, देवाला केळी ठेवणे,नवस बोलणे,नवस फेडणे, आदी कार्यक्रम होणार आहेत.रात्री टाळ म्रुदुगांच्या गजरात श्रींची पालखी होणार आहे.त्यानंतर पार्सेकर पारंपारिक दशावतार नाट्यमंडळाचे दशावतारी नाटक होणार आहे तरी सर्व भाविकांनी व नाटयरसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान कमिटी तर्फे करण्यात येत आहे.