राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रम साजरा –

वैभववाडी:/-

ग्राहकांनी काळजीपूर्वक आणि सजगपणे खरेदी केली पाहिजे. लोकांकडे पैसा आहे, पण वेळ नाही.कमी या धावपळीच्या जगात सर्व ग्राहकांनी वस्तू आणि सेवा खरेदी करताना सजग बनले पाहिजे असे प्रतिपादन वैभववाडीचे तहसीलदार रामदास झळके यांनी केले.
तहसील कार्यालय वैभववाडी आणि ग्राहक पंचायत महाराष्ट्र- कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा आणि वैभववाडी तालुका शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने तहसील कार्यालय वैभववाडी येथे तहसीलदार रामदास झळके यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय ग्राहक दिन संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. पुढे तहसीलदार म्हणाले,ग्राहकाला आपले हक्क आणि अधिकार समजण्यासाठी त्यांनी ग्राहक चळवळीत मध्ये सहभागी झाले पाहिजे.
यावेळी व्यासपीठावर वैभववाडीचे निवासी नायब तहसीलदार अशोक नाईक, वैभववाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देसाई, वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सुरज कांबळे, वैभववाडी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता कृष्णात सूर्यवंशी, राजापूर अर्बन बँकेचे शाखा व्यवस्थापक संतोष नारकर, पुरवठा अधिकारी रामेश्वर दांडगे, ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष व जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य प्रा.एस.एन.पाटील,कोषाध्यक्ष संदेश तुळसणकर, तालुका संघटक शंकर स्वामी आदी मान्यवर उपस्थित होते.
सुरुवातीला दिप प्रज्वलन व ग्राहक चळवळीचे अधिष्ठान असलेले स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर सर्व मान्यवरांचा जिल्हा शाखेच्यावतीने शाल- श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेने तयार केलेल्या माहिती व कार्यदिशा या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. ग्राहक पंचायत महाराष्ट्र, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्यावतीने राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त सन २०१९ व सन २०२० मध्ये आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. आसिया सांगावकर, प्रचीता दळवी, चैताली पवार, मंदार चोरगे, प्रथमेश पोळ आदी स्पर्धकांनी आपली मनोगते व्यक्त केली. यानंतर तालुका संघटक शंकर स्वामी यांनी तालुका शाखेच्या कार्याची माहिती दिली. कोषाध्यक्ष संदेश तुळसणकर यांनी संस्थेची रचना व कार्यपद्धती यावर मार्गदर्शन केले.प्रवीण देसाई, सुरज कांबळे, कृष्णात सूर्यवंशी व संतोष नारकर या मान्यंवरांनी संस्थेच्या कार्याला शुभेच्छा देऊन यापुढेही संस्थेला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. संस्थेचे जिल्हाध्यक्ष प्रा.एस.एन. पाटील यांनी ग्राहक संरक्षण कायदा-१९ मधील प्रमुख कलमे व कायद्याची वैशिष्ट्ये याबाबत सविस्तर माहिती दिली.
या कार्यक्रमाला एस. बी.शिंदे, विश्वास पवार, इंद्रजित परबते, सिद्धेश कुडाळकर, अंकिता गोरुले, संजय गोरुले, अजय सुर्वे, साहिल बाईत, प्रिया कानडे, अतिश माईणकर, प्रकाश साळुंके, दत्ताराम साटम, श्रेयांक पाटील, तहसिल कार्यालयातील पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेंद्रकुमार परब यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार नंदकिशोर प्रभु यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page