महाराष्ट्र राज्य काष्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाची ३ जानेवारी रोजी सभा

महाराष्ट्र राज्य काष्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाची ३ जानेवारी रोजी सभा

सिंधुदुर्गनगरी /-

महाराष्ट्र राज्य काष्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाची जिल्हा कार्यकारिणी अस्तित्वात नसल्यासारखी होती, याबाबत केंद्रीय संघटनेचे अतिरिक्त महासचिव रावजी गंगाराम यादव यांनी केंद्रीय अध्यक्ष एन.एम.पवळे यांचे लक्षात आणून दिल्यानंतर केंद्रीय अध्यक्ष एन.एम.पवळे यांनी रावजी यादव यांना नुतन जिल्हा कार्यकारिणी निवडण्याचे आदेश दिले त्या आदेशानुसार कल्याण महासंघाची जिल्हा कार्यकारिणी निवडण्यासाठी दिनांक ३ जानेवारी २०२१ रोजी नविन वर्षात क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीदिनी ओरोस हायस्कूल मध्ये सभा आयोजित करण्यात आली असून महाराष्ट्र राज्य काष्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे हितचिंतकांना तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, जिल्हा परिषद, शासन अनुदानित संस्था, विविध महामंडळातील वर्ग ४ ते वर्ग १ चे कार्यरत असलेले, सेवानिवृत्त झालेले अधिकारी कर्मचारी, कामगार यांना रावजी यादव यांनी आवाहन केले आहे की या सभेमध्ये सर्वानी सहभागी व्हावे अशी विनंती रावजी यादव यांनी केली आहे.

अभिप्राय द्या..