वेंगुर्लेत प्रधानमंत्री आवास दिन कार्यशाळा संपन्न..

वेंगुर्लेत प्रधानमंत्री आवास दिन कार्यशाळा संपन्न..

वेंगुर्ला /-

वेंगुर्ले पंचायत समिती सभागृहात आज सोमवारी प्रधानमंत्री आवास दिन कार्यशाळा संपन्न झाली.केंद्रपुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण व राज्य पुरस्कृत विविध आवास योजनांना गतिमान करणे व गुणवत्ता वाढीसाठी राज्यात महाआवास अभियान – ग्रामीण राबविणेबाबत तालुका स्तरावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यशाळेचे उदघाटन सभापती अनुश्री कांबळी यांच्या हस्ते झाले.यावेळी गटविकास अधिकारी उमा पाटील,पं. स.सदस्या साक्षी कुबल,कृषी विस्तार अधिकारी एस.एस.परब,कनिष्ठ प्रशासन अधिकारी संतोष चव्हाण,कनिष्ठ सहाय्यक संजना करंगुटकर,लविना फर्नांडीस, कर्मचारी आदींसह २५ लाभार्थी उपस्थित होते.यावेळी सन २०१६ -१७ ते २०१९ -२० अपूर्ण घरकुले लाभार्थी तसेच सन २०२० -२१ मध्ये नव्याने मंजुरी देण्यात आलेल्या लाभार्थी यांनी घरकुले लवकर पूर्ण करावीत,असे आवाहन सभापती यांनी केले.

अभिप्राय द्या..