सिंधुदुर्गनगरी /-
कुडाळ तालुक्यातील कसाल कार्लेवाडी येथील तारामती महादेव शेडूलकर वय वर्ष 68 यांना रेल्वेची धडक बसून त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. कणकवलीहून ओरोस च्या दिशेने येणाऱ्या रो रो रेल्वेची कसाल ब्रिज मेन दगड ३२५/६, ३२५/७ येथे धडक बसून तारामती शेडुलकर यांचा मृत्यू झाला असल्याची तक्रार सिंधूदुर्गनगरी रेल्वे स्टेशन मास्तर श्री. जमोटे यांनी दिली. पुढील तपास सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक एस एम गवस करत आहेत. सोमवारी सायंकाळी ही घटना घडली.