कणकवली /-

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग दौऱयावर आले त्याचवेळी सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी खासदार विनायक राऊत यांनी केलेली आहे. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी टर्मिनला शिवसेनेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल असे नाव दिले. त्याचप्रमाणे शिवसेना चिपी विमानतळाला देखील नाव देणार आहे. त्यामुळे नितेश राणेंनी चिपी विमानतळाच्या नामकरणाची चिंता करू नये. ज्यांनी बाळासाहेबांना त्रास दिला अशा गद्दारांना बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार नाही अशी खरमरीत टीका आमदार वैभव नाईक यांनी आ. नितेश राणेंवर केली आहे. राणेंनी शिवसेना सोडल्यानंतर बाळासाहेब व शिवसेना पक्षाला त्रास देण्याचे काम त्यांनी केले आहे. शिवसेना संपविण्याची भूमिका त्यांनी घेतली. सिंधुदुर्गात दहशत माजवली मात्र शिवसैनिकांनी टोकाचा संघर्ष करत राणेंचे सगळे वार परतून लावले. त्यानंतर शिवसैनिकांनी राणेंची काय अवस्था केली याची जाणीव राणेंना आहे. त्यामुळे बाळासाहेबांचे नाव घेऊन आपले राजकीय अस्तित्व पणाला लावण्याचा राणेंचा प्रयत्न आहे. मात्र सिंधुदुर्गाची जनता राणेंच्या या कुरघोडयांना ओळखून आहे. प्रत्येक कामात खोडा घालणारे राणे आता चिपी विमानतळ पूर्ण होत असताना त्याचे श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसत आहेत.परंतु सिंधुदुर्गच्या जनतेसमोर खोटेनाटे चालत नाही याची जाणीव राणेंनी ठेवावी. सिंधुदुर्ग जिल्हयात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चिपी विमानतळ हे मोठे प्रकल्प उभारायला राणेंना जमले नाहीत ते शिवसेनेच्या माध्यमातून पूर्ण होत आहेत. त्यामुळे दुसऱ्यांनी केलेल्या कामाचे श्रेय राणेंनी घेण्याची धडपड करू नये. राणेंनी कडवट शिवसैनिक असल्याची घेतलेली भूमीका हास्यास्पद आहे. निवडून येण्यासाठी आणि सत्तेसाठी या-ना-त्या राजकीय पक्षांमध्ये प्रवेश करणाऱ्यांना हे शोभत नाही. असा घणाघात आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

🛑 भाजपाच्या वतीने वेंगुर्लेत दिव्यांगांना ट्रायपॉड ( आधारकाठी ) चे वाटप* दिव्यांगांना अपंगत्व हे जन्मतः किंवा अपघाताने येते . दिव्यांग व्यक्ती ह्या असंख्य अडचणींचा सामना करीत जगण्यासाठी संघर्ष करीत असतात. अनेक दिव्यांगांना अडचणीतून सावरण्याचे काम आतापर्यंत भाजपाच्या माध्यमातून केले आहे . शारीरिक किंवा मानसिक त्रुटीमुळे विकलांग बनलेल्या समाजातील घटकांच्या समस्या समजावून घेऊन , दिव्यांगांचे प्रश्न जाणून घेऊन त्यांच्या उद्धारासाठी हातभार लागावा तसेच समाजातील अन्य लोकांना प्रेरणा मिळावी म्हणून भाजपा च्या वतीने दिव्यांगांसाठी विविध उपक्रम आयोजित केले जातात असे प्रतिपादन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांनी केले. भाजपा तालुका कार्यालयात आयोजित कार्यक्रमात वेंगुर्ले शहरातील अनिल शिवलाल राणे यांना ट्रायपॉड चे वाटप करण्यात आले. यावेळेस ता. सरचिटणीस बाबली वायंगणकर व पपु परब , मा.उपनगराध्यक्ष अभी वेंगुर्लेकर , युवा मोर्चा चे प्रणव वायंगणकर , सोमनाथ सावंत , दशरथ गडेकर , सोशल मिडीयाचे अमेय धुरी इत्यादी उपस्थित होते . तसेच उभादांडा – कुर्लेवाडीतील मनिषा नारायण रेवंणकर हीला घरी जाऊन ट्रायपॉड देण्यात आली. यावेळेस तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , जि.का.का.सदस्य मनवेल फर्नांडिस , मच्छिमार नेते दादा केळुसकर , ओबीसी सेल चे शरद मेस्त्री , शक्तिकेंद्र प्रमुख देवेंद्र डिचोलकर , बुथ प्रमुख आनंद मेस्त्री व किशोर रेवंणकर , दिवाकर कुर्ले ऊपस्थित होते .

You cannot copy content of this page