वेंगुर्ला /-
पीएम स्वनिधीअंतर्गत वेंगुर्ले बँक ऑफ इंडिया येथे पथविक्रेत्याना धनादेशचे वितरण करण्यात आले.यावेळी वेंगुर्ले नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप व अन्य मान्यवरांच्या हस्ते या धनादेशचे वाटप करण्यात आले.यावेळी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्यासह बँक ऑफ इंडियाचे मॅनेजर विनयप्रकाश वर्मा,युनियन बँक ऑफ इंडियाचे मॅनेजर रामकुमार वर्मा,पत्रकार के.जी. गावडे,अजय गडेकर, सहाय्यक प्रकल्प अधिकारी विलास ठुम्बरे,पाटलेकर, बँक स्टाफ,कर्मचारी आदी उपस्थित होते.