गॅस सिलेंडर ही जवळपास सर्वच घरात वापरली जाणारी एक प्रकारची जीवनावश्यक वस्तू आहे. गॅस कनेक्शन घेऊनही काही जणांना त्याचे फायदे हे माहीत नसतात याचाच फायदा काही लोक घेऊन आपली फसवणूक करतात. चला तर बघूया काय आहेत फायदे…
जर तुम्ही स्वतः सिलेंडर घरी घेऊन जात असाल तर सिलेंडर बुकिंग वेळी भरले जाणारे 19.50 रुपये डेलिएव्हरी चार्जेस तुम्ही गॅस एजन्सी कडून रिटर्न घेऊ शकता. कुठलीही गॅस एजन्सी यासाठी नाही म्हणू शकत नाही.सुरुवातीला ही रक्कम 15 रुपये होती महिन्याभरापूर्वी ती वाढवून 19.50 रुपये केली गेलीय.
एखाद्याने हे पैसे देण्यास नकार दिल्यास तुम्ही 18002333555 या टोल फ्री नंबर वर कॉल करू शकता.
तसेच ग्राहकांना वर्षाकाठी सबसिडीचे 12 सिलेंडर दिले जातात हा कोटा संपल्यावर बाजार दराने सिलेंडर खरेदी करावा लागतो.
तसेच अजून महत्वाचे म्हणजे जर सिलेंडर चा रेग्युलेटर लीक असल्यास तुम्ही तुमचा एजन्सी चे सबस्क्रिपशन वोउचर वापरून ते फ्री मध्ये एजन्सी कडून बदलून घेऊ शकता.त्यासाठी तो रेग्युलेटर तुम्हाला एजन्सी जवळ नेऊन सबस्क्रिपशन वोउचर व रेग्युलेटर नंबर जुळवून पहावा लागेल.
दोन्ही नंबर जुळल्यास कुठल्याही शुल्क ना घेता तुम्हाला रेग्युलेटर बदलून दिला जाईल.