कुडाळ तालुक्यात आज शनिवारी नव्याने एवढे कोरोना रुग्ण सापडले..

कुडाळ तालुक्यात आज शनिवारी नव्याने एवढे कोरोना रुग्ण सापडले..

कुडाळ /-

कुडाळ तालुक्यात आज शनिवारी दिनाक १९ डिसेंबर रोजी दिवसभरात मिळालेल्या माहितीनुसार ०३ कोरोना सक्रिय रुग्ण मिळाले आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.या मध्ये ओरोस मधील ०१ कोरोना रुग्ण आहेत.तर नेहरूनगर बांबुळी येथील ०१ आणि रानबांबुळी येथील ०१ कोरोना रुग्ण सापडले आहेत.असे तीन रुग्ण कुडाळ तालुक्यात सापडून आले आहेत.

कुडाळ तालुक्यात एकूण ५३३ एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी ५१५ कंटेन्मेट झोन पूर्ण झालेत. तर सध्या १८ कंटेन्मेट झोन शिल्लक आहेत. तालुक्यात एकूण रुग्ण १३१५ तर बरे झालेले रुग्ण १२३० आणि सक्रिय रुग्ण ४४,स्थलांतरीत ०२ आहेत.आतापर्यंत तालुक्यात ३९ रुग्ण मृत्युमुखी झाले आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली आहे.

अभिप्राय द्या..