कुडाळ बसस्थानकावरील आकर्षक घड्याळामुळे कुडाळच्या सौंदर्यात भर..

कुडाळ बसस्थानकावरील आकर्षक घड्याळामुळे कुडाळच्या सौंदर्यात भर..

आमदार वैभव नाईक यांचा पाठपुरावा..

कुडाळ /-

पूर्वी नगरपंचायत इमारतींवर घड्याळ बसविण्यात येत होती. त्यामुळे इमारतीच्या सौंदर्यात भर पडायची. मात्र नंतरच्या काळात नव्याने बांधण्यात आलेल्या नगरपंचायत इमारतींवर घड्याळे लुप्त झाली. मात्र कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी हि संकल्पना पुनर्जिवित केली आहे.त्यांनी कुडाळ गांधीचौक येथील नवीन बसस्थानक इमारतीसाठी निधी मंजूर करून इमारतीच्या प्लॅनमध्ये दर्शनी भागावर घड्याळाचा समावेश केला.

या इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. शुक्रवारी दिमाखात नव्या इमारतीवर हे घड्याळ झळकले असून प्रवाशांच्या सेवेत रुजू झाले आहे. हे घड्याळ पन्नास ते साठ फूट उंचीवर असल्याने दुरवरूनही स्पष्ट दिसत आहे. गेल्या २५ वर्षानंतर पहिल्यांदाच जिल्ह्यातील एखाद्या इमारतीवर घड्याळ बसविण्यात आले आहे. आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ वासियांना बसस्थानकाच्या माध्यमातून घड्याळाची हि अनोखी भेट दिली आहे.

यामुळे देश-विदेशातील इमारतींप्रमाणे कुडाळ बसस्थानकाची नूतन इमारत लक्षवेधी ठरत आहे. यामुळे कुडाळच्या सौंदर्यात देखील वाढ झाली आहे. आता हे बसस्थानक प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज झाले असून येत्या आठवड्याभरात परिवहन मंत्री ना.अनिल परब, यांच्या हस्ते व खासदार विनायक राऊत, पालकमंत्री ना. उदय सामंत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत बसस्थानकाचे उदघाटन करण्यात येणार आहे.

अभिप्राय द्या..