हाथरस जिल्ह्यात भेसळयुक्त बनावट मसाले तयार करण्याच्या एक कारखाना सील करण्यात आला. या प्रकरणी कारखान्याचा संचालक अनूप वार्ष्णेय याला अटक करण्यात आली आहे. वार्ष्णेय हा हिंदू युवा वाहिनीचा उपविभाग प्रभारी आहे.
 

हाथरस: मसाल्यासारख्या खाद्यपदार्थात गाढवाची लीद आणि घातक रसायनांची भेसळ  करण्याचा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात उघड झाला आहे. येथे गाढवाची लीद आणि घातक रसायनांचा वापर करत लोकल बँडचे बनावट मसाले तयार करणाऱ्या एका कारखान्याचा भांडाफोड झाला आहे. या मसाल्यात चांदी आणि इतर किंमती वस्तूंचा वापर केला जात असल्याचा दावा करण्यात येत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारखान्याचा संचालक अनूप वार्ष्णेय याला संध्या शांतता भंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. तो हिंदू युवा वाहिनीचा उपविभाग प्रमुख आहे.

हा कारखाना हाथरस पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या नवीपूर भागात सुरू होता. प्रशासनाचे सह महानगर दंडाधिकारी पी. पी. मीणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, छाप्यामध्ये काही स्थानिक ब्रँड्सच्या नावावर पॅक करण्यात येत असलेल्या ३०० किलोग्रॅमहून अधिक बनावट मसाले जप्त करण्यात आले.

छाप्यात हे बनावट मसाले तयार करण्यासाठी वापरण्यात येत असेलेल्या गाढवाची लीद, भूसा, अखाद्य हानिकारक रंग आणि रसायने अशा नुकसानकारक गोष्टींचा समावेश असलेले ड्रम देखील सापडले. या भेसळयुक्त मसाल्यांमध्ये धने पूड, लाल मिरचीची पूड, हळद आणि गरम मसाला तयार करण्यात येत होता. मसाला बनवण्यासाठी एकत्रित केलेले सामान देखील मोठ्या प्रमाणात मिळाले आहे.

अन्न विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या भेसळयुक्त मसाल्यांचे दीर्घकाळ सेवन केल्यास ते आरोग्यास घातक ठरू शकते. आता हे भेसळयुक्त मसाले कधीपासून तयार होत होते आणि त्यांचा पुरवठा कुठे कुठे होत होता हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. हे पाहिल्यानंतर विविध पथके तयार वितरीत करण्यात आलेले भेसळयुक्त मसाले जप्त करून लोकांना या फसवणुकीपासून वाचवता येणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page