ब्युरो न्यूज /-

नुकत्याच जन्मलेल्या आईसाठी तिचे बाळ हेच सर्वस्व असते. जर त्या बाळास काही झालेलं असेल तर त्याच्या वेदना बघणं सर्वात कठीण काम असते. बाळाला वाचवण्यासाठी मग आई-वडील काहीही करण्यास तयार असतात. अशीच काहीशी घटना समोर आली आहे. २९ वर्षीय मेगन विलिस आणि जॉन यांच्या जन्मजात बाळास एक आजार उद्भवला आहे. त्याच्या उपचारासाठी १६ कोटी ७० लाख रुपयांचे इंजेक्शन लावावे लागणार आहे.

८ आठवड्यांच्या या बाळास वाचवण्यासाठी मेगन आणि जॉन पूर्ण मेहनत करत असून, उपचारासाठी पैसे जमा करत आहेत. या तिघांकडे बघून असे वाटणारही नाही की, ते अडचणीत आहेत. मात्र, एकीकडे बाळाला होणारा त्रास आणि दुसरीकडे पाण्यासारखा होणार खर्च.

मिळालेल्या माहितीनुसार, एडवर्ड नावाच्या या २ महिन्याच्या बाळास जन्मताच स्पाइनल मस्कुलर एट्रोफी नावाचा आजार बळावला आहे. या आजारात एमएमएन नावाच्या प्रोटीनच्या कमतरतेमुळे मांसपेशींची ग्रोथ आणि मुव्हमेंट खुंटते.
याबाबत मेगन म्हणाली, आम्हाला एडवर्डला चालताना आणि बोलताना बघायचं आहे. यासाठी आम्ही काहीही करू शकतो. अशात एडवर्डच्या आई-वडिलांना आशेची किरण दिसली जेव्हा एका डॉक्टरांनी सांगितले की, त्यांचा मुलाचा जीव वाचू शकतो. पण त्याच्यासाठी बाळाला एक इंजेक्शन बरेच दिवस द्यावं लागेल. या इंजेक्शनची किंमत १.७ मिलियन म्हणजे १६ कोटी ७० लाख रूपये आहे.

Zolgensma नावाच्या या औषधाला जगातलं सर्वात महागडं औषध मानलं जातं. हे औषध शरीरात गेल्यावर एमएमएन प्रोटीन बनवणं सुरू करतं. सोबत पाठीचा कणाही मजबूत करण्यात मदत होते. एडवर्डला वाचवण्यासाठी त्याचे आई-वडील शक्य तो प्रयत्न करत आहे. त्यांना क्राउड फंडींगच्या माध्यमातून काही मदत मिळाली आहे. पण त्याला वाचवण्यासाठी आणखीही पैशांची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

You cannot copy content of this page