ब्युरो न्यूज /-
शरीराच्या योग्य वाढीसाठी भाज्या, कडधान्य यांच्यासोबतच फळांचं सेवन करणंदेखील तितकंच आवश्यक आहे.प्रत्येक फळामध्ये काही खास गुणधर्म असतात.जे शरीरासाठी फायदेशीर असतात.त्यामुळे अनेकदा डॉक्टरदेखील रुग्णांना फळे खाण्याचा सल्ला देतात. साधारणपणे पेरु, चिकू, द्राक्ष ही फळे आवर्जुन खाल्ली जातात.मात्र, डाळींब, संत्री अशी सालं सोलून खाण्याची फळं फार कमी प्रमाणात खाल्ली जातात.यात डाळींब सोलणं हे एकप्रकारचं दिव्यच असतं. त्यामुळे अनेक जण डाळींब खाण्यास कंटाळा करतात.परंतु, डाळींब खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे हे फायदे कोणते ते जाणून घेऊयात.
डाळींब खाण्याचे फायदे
डाळींब सेवन केल्याने चेहऱ्यावरील तेज वाढते.अपचन, आम्लपित्ताचा त्रास कमी होतो तशीच रोगप्रतिकारकशक्ती सुध्दा वाढते.घसा दुखणे, तोंड येणे हे आजार झाले असतील तर डाळिंबाच्या सालीच्या काढय़ाने गुळण्या कराव्या.डाळींबाच्या सेवनाने मूळव्याधीचा त्रास कमी होतो. ताप आल्यास डाळींब खावं. त्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते.डाळिंबाचे दाणे चावून चावून खाल्ल्यास दुर्गंधी निघून जाते. डाळींबामुळे शरीरातील रक्ताची कमतरता भरुन निघते.अपचन, पोटात गॅस होणे, शौचास साफ न होणे या तक्रारींवर डाळिंब फायदेशीर ठरते.जुलाब होत असतील तर डाळिंबाच्या सेवनाने ते लगेच थांबतात.डाळींबामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहून रक्ताभिसरण क्रिया सुधारते. यामुळेजुनाट खोकला सुध्दा नाहीसा होतो.