वेंगुर्ला / –
सिंधुदुर्ग जिल्हा विश्वकर्मा सुतार व शिल्पकार समाज मंडळ , सिंधुदुर्ग चे क्रियाशील पदाधिकारी तसेच वेंगुर्ले येथील मातोश्री कला क्रीडा , दाभोलीनाका मंडळाचे संस्थापक सदस्य शरद मेस्त्री यांची भाजपाच्या ओबीसी सेलचे जिल्हा पदाधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल भाजपा वेंगुर्ले च्या वतीने तालुका कार्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला .भाजपा ओबीसी सेलचे जिल्हा संयोजक दिपक नारकर यांनी शरद मेस्त्री यांची निवड जाहीर केली . यावेळी खानोली येथील मनोहर खानोलकर यांचीही निवड जाहीर करण्यात आली .तालुका कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभाला जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ टोमके , मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर , ता सरचिटणीस बाबली वायंगणकर , ता.उपाध्यक्ष दिपक नाईक , नगरसेविका श्रेया मयेकर , नगरसेवक धर्मराज कांबळी , बुथप्रमुख शेखर काणेकर , सुजय गांवकर , सिद्धेश मेस्त्री , गावडे आदी उपस्थित होते .