शेअर मार्केटमधील गुंतवणूक फायदेशीर की धोकादायक ?याबाबत मालवण येथे आयोजित कार्यशाळेस उत्स्फुर्त प्रतिसाद..

शेअर मार्केटमधील गुंतवणूक फायदेशीर की धोकादायक ?याबाबत मालवण येथे आयोजित कार्यशाळेस उत्स्फुर्त प्रतिसाद..

मालवण /-

शेअर मार्केटमध्ये पैसे बुडतात अशी भिती लोकांमध्ये असते. त्यामुळे अनेक लोक शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास धजावत नाही. एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी करताना त्या कंपनीचा संपूर्ण इतिहास जाणून घ्या त्यानंतरच कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करा असे प्रतिपादन कबीर गुंतवणूक सल्ला केंद्र आणि प्रशिक्षण संस्था पुणेचे संचालक चिन्मय तिनईकर यांनी बॅ. नाथ पै सेवांगण येथे बोलताना केले.

मालवण व्यापारी संघ, बॅ, नाथ पै सेवांगण, अभियान आम्ही मालवणी आणि कबीर इन्सिटट्यूट पुणे यांच्यावतीने शेअर मार्केटमधील गुंतवणूक फायदेशीर की धोकादायक? या विषयावर मोफत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना तिनईकर हे बोलत होते. याप्रसंगी लक्ष्मीकांत खोबरेकर, अरविंद सराफ, नितीन वाळके, रविंद्र तळाशीलकर, संजय वराडकर, गणेश प्रभुलकर, किरण कारेकर, गार्गी ओरसकर, सुहास ओरसकर, डॉ. शशिकांत झाटय़े, सामंत, पी. के. चौकेकर, वैष्णवी आचरेकर, प्रमोद ओरसकर, सुर्यकांत फणसेकर आदि उपस्थित होते.

अभिप्राय द्या..