कुडाळ /-

कुडाळ तालुक्यातील कुपवडे गावातील शेकडो लोकांनी आज राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रदेश संघटक काका कुडाळकर आणि जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादी तळागाळात पोचत असून या पुढच्या काळात पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्व निवडणुकीत राष्ट्रवादी सर्व ताकदीनिशी उतरेल असे जिल्हाध्यक्ष अमित सामंत बोलताना म्हणाले.

यावेळी ओबिसि सेलचे जिल्हाध्यक्ष बाळ कनयाळकर, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हा कार्याध्यक्ष नजीर भाई, पांडुरंग मेस्त्री, बाळा कुंभार, संजय शिर्के, आबा मेस्त्री, नंदू ढवळ, आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष अमित सामंत म्हणाले कि, जिल्ह्यात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन मोठ्या संख्येने कार्यकर्ते पक्षात प्रवेश करत आहेत. त्यांची निराशा होणार नाही याची जिल्हाध्यक्ष म्हणून मी ग्वाही देतो. कार्यकर्त्यांच्या पाठीशी राहतानाच आपण सुचविलेली विकासकामे पक्षाचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या माध्यमातून मार्गी लावण्याचा प्रयत्न करू असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी मनोहर केरकर, मायकल डिसोझा, शुभांगी परब, मनीषा सावंत, पल्लवी सावंत, अस्विनी सावंत, रोशनी सावंत, अलका सावंत, काका सावंत,गवळदेव इसवटी मंडळ कुपवडे सुसट वाडी अध्यक्ष प्रभाकर परब, भालचंद्र सावंत, किशोर तेली, वंदना सावंत, बाळकृष्ण सावंत, अनंत सावंत, मनाली सावंत, भास्कर परब, संदेश सावंत, नागेश सावंत, वासंती चाळके यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page