सावंतवाडी /-
सावंतवाडी शहरात आज पुन्हा एकदा अवकाळी पावसाने सुरुवात केल्याने त्याचा परिणाम सावंतवाडीतील प्रसिद्ध माठेवाड्यातील जत्रेवर झाला आहे. रात्री ८ च्या सुमारास अचानक अवकाळी पावसाने सुरुवात केल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. काल संध्याकाळी देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. सलग दुसऱ्या दिवशी देखील अवकाळी पावसाने नागरिकांसह व्यापाऱ्यांना फटका दिला आहे.