सावंतवाडी /-
शहरातील सर्वोदय नगर येथील मुख्य रस्त्यांवर एक कुत्रा जख्मी अवस्थेत वेदनेने विव्हळत पडला असल्याचे प्राणी मित्र अचल माणगावकर यांच्या निदर्शनास येताच त्यांनी सामाजिक कार्यकर्ते मंगेश तळवणेकर यांना याबाबत माहिती दिली. त्यांनी लगेच ही बाब पशुधन अधिकारी पं. स. सावंतवाडी चे डॉ. ठाकूर व पशु वैद्यकीय कर्मचारी अनिल जोशी यांना याबाबत कल्पना दिली.यांनी तत्काळ त्या जख्मी कुत्र्यावर उपचार सुरू करत पुढील पंधरा दिवस एक दिवस आड करत इंजेक्शन देत उपचार सुरू ठेवण्याची ग्वाही दिली आहे. तसेच कुत्र्याची तब्ब्येत ठीक होईपर्यंत त्याच्या जेवणाची जबाबदारी शुभागी नार्वेकर यांनी घेतली आहे. या कामात लक्ष्मण देऊलकर यांची ही मदत लाभली आहे. याबाबत सर्वच स्तरातून प्राणी मित्रांचे कौतुक होत आह.