देशातील सर्व शेतकऱ्यांनी कृषी कायद्याच्या विरोधात दिल्ली येथे मोर्चा आणला पण तो मोर्चा फेटाळून लावण्यासाठी केंद्र सरकार विविध प्रयत्न करीत असताना सुद्धा शेतकरी कडाक्याच्या थंडीत दिल्ली येथे बसून आहेत पण त्यांची दखल कोणीच घेत नसल्यामुळे आठ 12 रोजी भारत बंद करण्यात आला आहे या भारत बंदला छावा युवा संघटनेचा पाठिंबा असून संघटनेची सर्व कार्यकर्ते रस्त्यावर उतरून भारत बंदचे समर्थन करतील अशी माहिती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजेश पाटील मोरे यांनी दिली आहे
केंद्र सरकारने आणलेले नवीन कृषी कायदे हे शेतकरीविरोधी असून हे कायदे तात्काळ बंद करण्यात यावेत या मागणीसाठी पंजाब हरियाणा येथून पायपीट करून शेतकरी दिल्लीत आले परंतु त्यांची दखल न घेता ह्या मुजोर सरकारने तो मोर्चा बंद पाडण्यासाठी अनेक केविलवाणे प्रयत्न केले परंतु शेतकऱ्यांनी सरकारचे सर्व प्रयत्न फेटाळून लावत अजूनही कडाक्याच्या थंडीत दिल्लीत बसून हा मोर्चा पूर्णपणे पार पडत आहेत याची दखल तात्काळ सरकारने घ्यावी यासाठी दिनांक 8 12 2020 रोजी भारत बंद चे आयोजन करण्यात आले आहे या भारत बंदला छावा युवा संघटनेच्या वतीने पाठिंबा असल्याची माहिती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजेश पाटील मोरे यांनी दिली