मालवण /-
युवा परीवर्तन संस्था या भारतातील सर्वात मोठ्या कौशल्य विकास प्रशिक्षण संस्थेमार्फत मालवण पालिकेच्या मामा वरेरकर नाट्यगृहात ९ व १० डिसेंबरला सकाळी ९.३० ते पाच या वेळेत दोन दिवसीय केक मेकिंग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वांची गरज ओळखून संस्थेच्यावतीने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या केक मेकिंग कार्यशाळेत घरच्याघरी कमीत कमी साहित्यात आपल्या मन पसंतीचे केक बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यशस्वी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर नॅशनल स्किल डेव्हलपमेंट भारत सरकारमान्य प्रमाणपत्र संबंधित प्रशिक्षणार्थ्यास दिले जाणार आहे.
प्रशिक्षणाचा कालावधी दोन दिवस असून पहिल्या दिवशी चार बेस केक प्रकार, चार आईस केक प्रकार, ब्लॅक फॉरेस्ट, व्हॅनिला, पायनापल, डॉल केक, केक डिझाईन व सराव तर दुसऱ्या दिवशी चार बेस प्रकार व आईस केक प्रकार केक डीझाईन व सराव होणार आहे. कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी आधार कार्ड झेरॉक्स, दोन पासपोर्ट साईज फोटो, प्रशिक्षण शुल्क आदी आवश्यक असून अधिक माहितीसाठी शिल्पा यतीन खोत – मालवण, स्वराज्या व सेवते प्रतिष्ठान अध्यक्षा – ९३२६४७७७०७ यांच्याशी संपर्क साधावा. जास्तीत जास्त लोकांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.