कुडाळ /-

केंन्द्र सरकारच्या कृषि कायद्या विरोधात राजधानीत दिल्ली. पंजाब, हरियाणासह देशातील इतर भागातील शेतकर्‍यांनी गेल्या अकरा दिवसांपासून दिल्ली येथे बेमुदत आंदोलन पुकारले आहे.माञ शेतकरी विरोधी असलेले भाजप सरकार या आंदोलनाची दखल घेत नसल्याने हे आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला असून ८ डिसेंबरला संपूर्ण भारत बंदचे आंदोलन पुकारले आहे. शेतकऱ्यांच्या या भारत बंद आंदोलनास सिंधूदूर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा जाहीर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शेतकऱ्यां बरोबर असल्याचे सांगून उद्याचा शेतकऱ्यांचा बंद यशस्वी करण्यासाठी सिधूदूर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पूर्ण सहकार्य राहील.

नविन शेतकरी कायद्यामुळे किमान हमीभाव अर्थात एमएस पी व्यवस्थेचे संरक्षण करावे ही शेतकर्‍यांची प्रमुख मागणी आहे. ही मागणी.नविन कायद्यामुळे एम एसपी व्यवस्था मोडकळीस निघेल अशी भीती शेतकर्‍यांमध्ये आहे. आपल्या हक्काच्या बाजारपेठावर गदा आल्याची भावना शेतकर्‍यांमध्ये निर्माण झाली आहे. यामुळे शेतकरी वाचला पाहिजे. केन्द्र सरकार फक्त चर्चेच आमीष दाखवते पण शेतकरी विरोधी केलेले कायदे रद्द करण्याचा निर्णय घेत नाही.म्हणुन भाजपच्या केंद्र सरकारच्या हिटलर शाही भूमिकेच्या विरोधात देशातील शेतकऱ्यांनी ८ डिसेंबरला भारतबंदची घोषणा केली आहे. या भारत बंदला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा असल्याचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी जाहीर केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page