मालवण /
मालवण कसाल रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहन चालवताना होणाऱ्या त्रासाची सत्ताधाऱ्यांना दखल घ्यावी असे वाटत नाही म्हणून रस्त्यावरील खड्ड्यांची पूजा करून त्यांना जनतेला जीवदान देण्याचे साकडे घालून अभिनव आंदोलन भाजप तर्फे येत्या चार दिवसात मालवण कसाल रस्त्यावर करण्यात येणार असल्याचे भाजपचे मालवण तालुका अध्यक्ष धोंडी चिंदरकर व सभापती अजिंक्य पाताडे यांनी जाहीर केले आहे.
सत्ताधारी फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत.जनतेचे कंबरडे मोडले आहे..विकासाच्या फक्त वल्गना केल्या जातायत आणि जनता बिचारी वाऱ्यावर सोडलिय..वाहनचालक,रिक्षा व्यावसायिक यांचे या खड्ड्यांमुळे आतापर्यंत अतोनात नुकसान झाले आहे.आता पर्यटन हंगाम सुरू झाल्याने अपघात सुद्धा या खड्ड्यांनी होणार आहेत..म्हणूनच आता खड्ड्यासोबत जगायचे असल्याने खड्ड्यांची पूजा करून त्यांनाच जनतेचे जीव वाचवण्याचे उपहासात्मक साकडे घालणार असल्याचे संयुक्तपणे द्वयीनी म्हटले आहे.तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्त्याचे काम करण्याबाबत आठ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात येणार आहे.सदर आंदोलनात जनतेने ही उस्फुर्त सहभाग घ्यावा असे आवाहन या द्वयीनी केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page